Special Report MLA Son Accident: आमदार सुरेश धस यांच्या पुत्राच्या गाडीने एकाचा मृत्यू, 'ड्रिंक अँड ड्राइव्ह' नाहीच!

अहिल्यानगरमध्ये आमदार सुरेश धस यांच्या मुलाच्या गाडीच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर धस सोमवारी रात्री पुण्याहून नगरकडे येत असताना, रात्री साडेदहाच्या सुमारास नितीन प्रकाश शेळके हे बाईकवरून घरी जात होते. नगर पुणे रस्ता ओलांडताना सागर धस चालवत असलेल्या भरधाव कारने शेळकेंना जोरदार धडक दिली. त्यात कारखाली चिरडल्यामुळे नितीन शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. नितीन शेळके हे चौतीस वर्षीय हॉटेल व्यावसायिक होते. अपघातानंतर सागर धस यांनी स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. गुन्हा दाखल झाल्यावर सागर धसवर कायदेशीर कारवाई झाली आणि जामिनावर त्याची सुटकाही झाली. या प्रकरणात ड्रिंक अँड ड्राइव्हची कोणतीही शक्यता नाही असे आमदार धस यांनी सांगितले. "माझा मुलगा सुपारी सुद्धा खात नाही. त्याच्यामुळे ड्रिंक अँड ड्राइव्हवर हे फार लांब राहील. विनाकारण गैरसमज असतात," असे धस यांचे म्हणणे आहे. त्यांनी या प्रकरणात कोणताही दबाव वापरला नसल्याचेही स्पष्ट केले. यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणात आमदार धस यांनी निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola