Satyajeet Tambe : 'अमित शहांना सुतळी बॉम्ब देणार', आमदार सत्यजित तांबेंची राजकीय फटाकेबाजी
Continues below advertisement
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी शिर्डीत दिवाळीच्या फटाक्यांची खरेदी करताना अनेक राजकीय नेत्यांसाठी खास फटाके निवडले. यावेळी बोलताना त्यांनी अमित शाह, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांवर मिश्किल टिप्पणी केली. 'मी हा अॅटमबॉम्ब खरंतर अमित शहा साहेबांना देईन, कारण सगळेजण त्याला घाबरतात,' असे वक्तव्य तांबे यांनी केले. [N/A] यासोबतच, राज ठाकरे यांच्या वक्तृत्वाची तुलना त्यांनी फटाक्यांच्या लडीशी केली, तर बाळासाहेब थोरात यांच्या हाती 'गदा' देण्याची इच्छा व्यक्त केली. विश्वजित कदम यांना 'हेलिकॉप्टर' आणि महाविकास आघाडीला 'ट्रिपल सीट' फटाका देणार असल्याचेही ते म्हणाले. या खरेदीतून तांबेंनी आपल्या खास शैलीत राजकीय टोलेबाजी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement