Defender Row: '...कमिशनमधून Defender घेतली', आमदार Sanjay Gaikwad यांच्यावर BJP जिल्हाध्यक्षांचे गंभीर आरोप!

Continues below advertisement
बुलढाण्यातील शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि त्यांच्या दीड कोटींच्या डिफेंडर (Defender) गाडीवरून वाद पेटला आहे. 'ज्या गाडीची चर्चा होत आहे, ती गाडी नीलेश ढवळे (Nilesh Dhawale) या कंत्राटदाराची आहे, ती शंभर टक्के कर्ज काढून घेतलेली आहे,' असे स्पष्टीकरण स्वतः आमदार गायकवाड यांनी दिले आहे. ही गाडी कोणत्या कामाच्या कमिशनमधून मिळाली, असा थेट सवाल भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे (Vijayraj Shinde) यांनी केल्याने महायुतीत नवा वाद निर्माण झाला आहे. यावर, गाडीचे मालक आणि गायकवाड यांचे नातेवाईक असलेले निलेश ढवळे यांनी आपण कोणत्याही चौकशीसाठी तयार असल्याचे म्हटले आहे. सध्या कोणतेही टेंडर नसल्याने कमिशन देण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola