एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात 1 लाखांवर बोगस मतदार, सत्ताधारी आमदाराचा घरचा आहेर
बुलढाणा (Buldhana) मतदार यादीतील घोळावरून (Voter List Issue) शिवसेना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. 'बुलढाणा जिल्ह्यात लाखापेक्षा अधिक बोगस मतदार आहेत आणि निवडणूक आयोग ही नावं काढायला तयार नाही,' असा थेट आरोप गायकवाड यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector) ४ हजार दुबार नावांची यादी लेखी स्वरूपात दिल्याचं सांगितलं. तसेच, अनेक वर्षांपूर्वी बदली होऊन गेलेले अधिकारी आणि मृत व्यक्तींची नावेही मतदार यादीत कायम असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे नवीन तरुण मतदारांची नोंदणी रखडली असून, त्यांचे मतदानाचे हक्क हिरावून घेतले जात आहेत का, असा संतप्त सवालही गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















