Political Fireworks: 'संजय राऊत म्हणजे फुसका बार', आमदार Kishore Jorgewar यांची दिवाळी फटाकेबाजी
Continues below advertisement
चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार (Kishor Jorgewar) यांनी दिवाळीच्या निमित्ताने राजकीय फटाकेबाजी करत राज्यातील प्रमुख नेत्यांवर आपल्या खास शैलीत भाष्य केलं आहे. 'संजयजी राऊत हे दिसणाऱ्या मोठ्या, पण फुसक्या लादेन बॉम्बसारखे आहेत', अशा शब्दात जोरगेवार यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर थेट निशाणा साधला. तर दुसरीकडे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची तुलना अचूक लक्ष्य साधणाऱ्या रॉकेटशी केली. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना फॅन्सी पण निरुपयोगी फटाका संबोधले, तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांना चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी फुटणारा 'टू-साऊंड' फटाका म्हटले. वडेट्टीवार ओबीसी आंदोलनाबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी भूमिका घेतात, असा आरोपही त्यांनी केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement