एक्स्प्लोर

MLC Elections : काँग्रेसचे 'ते' आमदार क्रॉस व्होटिंग करणार? जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

MLC Elections : काँग्रेसचे 'ते' आमदार क्रॉस व्होटिंग करणार? जयंत पाटील नेमकं काय म्हणाले? विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये घोडेबाजार होणार नाही, महायुतीचे सर्व आमदार एकत्र असून शंभर टक्के आमचेच सर्व उमेदवार निवडून येणार असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. यावेळी राजकीय भूकंप झालाच तर तो आम्हीच करू विरोधकांकडून तो होऊ शकत नाही, असं देखील दानवे यांनी म्हटलं आहे.   विरोधकांना आरक्षणाबाबत आस्था नाही दरम्यान, मराठा आरक्षणाच्या बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्या विरोधकांना आरक्षणाबाबत आस्था नाही अशी टीका दानवे यांनी केली. फडणवीस यांच्यावर जरांगेंकडून होणाऱ्या टीकेवर बोलताना प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य असल्याचं दानवे म्हणाले.   महायुती आणि मवाकडे एकूण किती आमदार? महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीकडे सध्या एकूण 200 आमदार आहेत, तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीला स्वबळावर उमेदवार निवडायचा असेल तर आणखी 4 मतांची गरज आहे, तर ठाकरे गटाला उमेदवार निवडायचा असेल तर 8 मतांची गरज आहे. भाजपा आपले चार उमेदवार स्वबळावर निवडून आणू शकतो. जर पाचवा उमेदवार निवडून यायचा असेल तर त्यांच्याकडे स्वतःची 8 मते असणे आवश्यक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पक्षाला आपापली मते गोळा करावी लागणार आहेत.  काँग्रेसच्या मतांची विभागणी होण्याची शक्यता किती? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसने अद्याप हॉटेल बुक केलेले नाही. सर्व आमदारांना एकत्रित मतदान कसे करायचे हे सांगितले आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मते असून 23 मतांचा कोटा पूर्ण केल्यानंतर 14 मते शिल्लक आहेत. जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना ही मते मिळू शकतात. पण, प्रत्येक पक्षाला कमी पडणारी मते गोळा करायची आहेत.  11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणूक लढवणार महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. ज्यासाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेना शिंदे गट, भाजप, उद्धव ठाकरे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.  लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या वातावरणाचा फायदा कोणाला होणार? महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा वरचष्मा आहे. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत महायुती भक्कम दिसत आहे. त्यामुळे 11 पैकी 9 जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत असले तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या वातावरणात शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार पक्ष बदलतील हे नाकारता येणार नाही. तसे झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला होईल.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP MajhaPandharpur Babanrao Shinde vs Dhanraj Shinde : बबनदादा शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेंचं आव्हानTop 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Embed widget