Bacchu Kadu Farmer Protest: बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?

Continues below advertisement
शेतकरी नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या अलीकडील आंदोलनावर आणि सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 'तुम्ही असले आरोप करणं म्हणजे मूर्खपणाचंच लक्षण आहे, तो मूर्खाच्याच लिस्टमध्ये त्याला टाकलं पाहिजे,' अशा शब्दात त्यांनी आपल्या आंदोलनाला 'मॅनेज' म्हणणाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या घोषणेचे त्यांनी समर्थन केले, ही घोषणा आज झाली असती तर चालू वर्षातील (२०२५-२६) शेतकरी त्यातून वगळले गेले असते, असे ते म्हणाले. पावसामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आंदोलन स्थगित करावे लागले, पण सरकारने चर्चेची तयारी दाखवली होती. सरकारने ९ ऑक्टोबर २०२५ रोजी एक शासन निर्णय काढून शेती कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली आहे, याचाही त्यांनी उल्लेख केला. तसेच, २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीचे पैसे अजूनही अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत, हे मुद्देही त्यांनी मांडले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola