Farm Loan Waiver: 'गरज पडल्यास कर्ज काढा, पण वचन पाळा', Abdul Sattar यांचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
Continues below advertisement
सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.. 'गरज पडल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने कर्ज काढावं आणि दिलेलं वचन पाळलं पाहिजे', असे महत्त्वपूर्ण वक्तव्य सत्तार यांनी केले आहे.. आम्ही तिन्ही सत्ताधारी पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे वचन दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.. सत्तार यांच्या या थेट भूमिकेमुळे, आधीच कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक असलेल्या विरोधी पक्षांना सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एक नवीन संधी मिळाली आहे.. जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आपण दिलेल्या शब्दाच्या जबाबदारीतून मुक्त होणार नाही, असेही ते म्हणाले..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement