Vikhe patil Karjmafi Statment : विखे पाटलांच्या कर्जमाफीवरील विधानामुळे नवा वाद
Continues below advertisement
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि नंतर पुन्हा कर्जमाफी मागायची हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,' असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तथापि, महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांनी विखे पाटील यांच्या वक्तव्याची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. विखे पाटील यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना हे विधान केले. चूक लक्षात आल्यानंतर त्यांनी 'महायुती सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे आणि आम्ही शंभर टक्के कर्जमाफी करणार आहोत' असे म्हणत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement