Thackeray Brothers: 'दोन्ही ठाकरेंना आता पर्याय नाही', मंत्री Bharat Gogawale यांचा टोला
Continues below advertisement
राज्याचे रोहयो मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी ठाकरे बंधूंच्या (Thackeray Brothers) संभाव्य युतीवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात सुरू असलेल्या भेटीगाठींवरून ते महाविकास आघाडीत (MVA) सामील होणार का, या चर्चांना उधाण आले आहे. 'दोन्ही ठाकरे बंधूंना आता कुठलाही पर्याय उरलेला नाहीये आणि त्यामुळे ते सारखे एकत्र येत आहेत', असा टोला भरत गोगावले यांनी लगावला आहे. राज्यातील दोन्ही पक्षांची राजकीय परिस्थिती पाहता ते एकत्र येत असावेत, असेही ते म्हणाले. मात्र, दोन्ही भाऊ एकत्र आले तरी त्या परिस्थितीला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत, असे आव्हानही गोगावले यांनी दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात जवळीक वाढली असून, त्यांच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement