एक्स्प्लोर
Aditi Tatkare, Aniket Tatkare Interview : आदिती तटकरे राजकारणाकडे कशा वळल्या?
राज्याचे मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) आणि त्यांचे बंधू अनिल तटकरे (Anil Tatkare) यांनी त्यांच्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील अनेक अज्ञात पैलू उलगडले. 'लहानपणापासून आपण गावात राहिलेलो असतो, कंफर्ट झोनच्या बाहेर कधी आलेलो नसतो, त्यामुळे मुंबईत आल्यानंतर एक न्यूनगंड असतो,' अशी प्रांजळ कबुली आदिती तटकरे यांनी दिली. वडील कॅबिनेट मंत्री असतानाही आपण एसटी बसने प्रवास करायचो, असे त्यांनी सांगितले. राजकारणातील अनिश्चिततेमुळे आईचा राजकारणात येण्यास तीव्र विरोध होता, कारण तिने वडील आणि सासरे दोघांनाही राजकारणात पाहिलं होतं, असे अनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. आदिती तटकरे यांनी २०१७ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली, तर अनिल तटकरे हे २००९ पासूनच राजकारणात सक्रिय होते. पुस्तकी राजकारण आणि प्रत्यक्ष राजकारण यात जमीन-अस्मानाचा फरक असल्याचेही त्यांनी मान्य केले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ऑटो
भारत
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















