एक्स्प्लोर
Solapur Politics: सोलापुरात भाजपमध्ये मोठी भरती, अनेक पक्षांचे नेते, माजी नगरसेवकांचा प्रवेश
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर (Solapur) भाजपमध्ये (BJP) मोठी मेगाभरती सुरू असून, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) हेसुद्धा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी उपमहापौर पद्माकर काळे (Padmakar Kale), शिवसेनेतील माजी उपमहापौर दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक गुरुशांत धुत-धुत्तरगावकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर, माजी सभागृह नेते सुरेश पाटील (Suresh Patil) आणि बिजू प्रधाने (Biju Pradhane) यांनी भाजपमध्ये घरवापसी केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















