एक्स्प्लोर
Gotya Gitte Mcoca | वाल्मिक कराडच्या राईट हँड गोट्या गित्तेसह 5 आरोपींवरील मकोका रद्द
बीडमध्ये गोट्या गित्तेसह पाच आरोपींवरील MCOCA रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परळीतील सहदेव सातभाई खून प्रकरणात हा MCOCA गुन्हा दाखल झाला होता. कराड समर्थक रघुनाथ फड गँगवर MCOCA अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता पोलीस महासंचालकांनी सातपैकी पाच आरोपींवरील MCOCA रद्द केला आहे. या निर्णयामुळे बीडमध्ये चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत बीडमध्ये चार गँगवर MCOCA अंतर्गत कारवाई झाली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या कारवाई करण्यात आल्या होत्या. मे महिन्यात फड गँगवर MCOCA अंतर्गत कारवाई झाली होती, ज्यात सात जणांचा समावेश होता. मात्र, आता पाच जणांची नावे वगळण्यात आली आहेत. यात गोट्या गित्ते, जगन्नाथ फड, संदीप सोनवणे, बालाजी दहिफळे आणि विलास गित्ते यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे गोट्या गित्ते या आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असूनही त्याचे नाव वगळण्यात आले आहे. एका शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या प्रकरणात हा गुन्हा दाखल झाला होता. नाव वगळण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
बातम्या
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















