एक्स्प्लोर
MCA Elections: एमसीए अध्यक्षपदासाठी नेत्यांच्या पवारांकडे फेऱ्या
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) आणि मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. ‘शरद पवार (Sharad Pawar) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या दोघांच्या एकत्रित संमतीनंतरच कुठल्यातरी एका उमेदवाराचं नाव निश्चित होईल’, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक (Ajinkya Naik) यांची मुदत संपत असल्याने १२ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी अनेक राजकीय नेते इच्छुक आहेत. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार किरण सामंत (Kiran Samant) हेही MCA प्रशासनात येण्यास उत्सुक असून, त्यांचे बंधू आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनीही याबाबत शरद पवारांशी चर्चा केल्याचे समजते.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement















