एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Navi Mumbai Fire : रबाळे MIDC मध्ये भीषण आग, केमिकल कंपनी जळून खाक, विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
नवी मुंबईतील (Navi Mumbai) रबाळे एमआयडीसीमधील (Rabale MIDC) मेणाचे साहित्य आणि मच्छर मारण्याचे औषध बनवणाऱ्या केमिकल कंपनीला (Chemical Company) भीषण आग लागली. या दुर्घटनेत कंपनीचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 'आतमध्ये केमिकल मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जोपर्यंत ते पूर्णपणे जळून खाक होत नाही तोपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवणं मुश्किल आहे,' अशी माहिती अग्निशमन विभागाकडून (Fire Department) देण्यात आली आहे. रात्री साधारण दोन वाजता लागलेली ही आग विझवण्यासाठी ऐरोली, घनसोली आणि वाशी येथून अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे स्वरूप भीषण असल्याने बाजूच्या कंपन्यांमध्ये ती पसरू नये यासाठी जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या आगीत संपूर्ण केमिकल कंपनी जळून खाक झाली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















