एक्स्प्लोर
Vijay Wadettiwar : छगन भुजबळांना भाजपने माझ्यावर आरोप करायला सोडलं - वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या (Maratha-OBC Reservation) मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'नागपूरमधील मोर्चांनंतर मला टार्गेट करण्यासाठी भाजपने भुजबळांना माझ्या अंगावर फोडलं,' असा थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. दोन समाजात भांडणं लावून मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्याचे काम महायुती सरकार करत असल्याचेही ते म्हणाले. ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध नाही, पण सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास आपला विरोध कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 'जरांगे पुराण' थांबवून सरकारने काढलेल्या जीआरवर (GR) म्हणजेच 'सरकार पुराणावर' चर्चा झाली पाहिजे, कारण ओबीसींचे खरे नुकसान त्याच जीआरमुळे होत आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















