एक्स्प्लोर
Hyderabad Gazetteer GR : हैदराबाद गॅझेट जीआरला हायकोर्टाचा नकार, सरकारला दिलासा
मराठा आरक्षणासंदर्भातल्या Hyderabad Gazetteer च्या GR ला अंतरिम स्थगिती देण्यास High Court ने नकार दिला आहे. यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. Hyderabad Gazetteer च्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात High Court मध्ये याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांच्या माध्यमातून २ सप्टेंबरचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निर्णयाला स्थगिती देण्यास High Court ने नकार दिला. प्रदीर्घ सुनावणीच्या नंतरच निर्णय देऊ शकतो असे High Court ने म्हटले आहे. तसेच, Court च्या फैसल्यापर्यंत शासन निर्णयानुसार प्रमाणपत्र न देण्याची मागणीदेखील उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. राज्य सरकारला तातडीने किंवा काही आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश द्यायला सांगता येणार नाही असेही Court ने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांच्या नंतर घेतली जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















