एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Morning Prime Time News : 9 AM : Maharashtra News : 17 OCT 2025 : मॉर्निंग प्राइम टाईम : ABP Majha
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेवर (OBC Mahaelgar Sabha) जोरदार टीका केली आहे. 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) जीआर काढला आहे, त्याविरोधात भुजबळ राज्यभर का फिरताहेत?', असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे. जरांगे यांनी फडणवीसांना मराठा समाजाचे जिंकलेले मन न दुखवण्याचा सल्लाही दिला. बीडमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात १७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ओबीसी महाएल्गार सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेच्या माध्यमातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जीआरला विरोध केला जाणार आहे. जरांगे यांच्या या टीकेमुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुजबळांच्या या सभा म्हणजे मराठा समाजाविरोधात षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















