एक्स्प्लोर
Banjara Reservation : बंजारा आंदोलकाला भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ चर्चेसाठी जाणार
मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन तीव्र झाले असून, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. 'मी मरायला तयार आहे, पण आरक्षणाशिवाय मुंबई सोडणार नाही,' असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या असून, निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे (Justice Sandeep Shinde) यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ जरांगे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी (OBC) प्रवर्गातून आरक्षण द्यावे, ही जरांगे यांची प्रमुख मागणी आहे. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सुरुवातीच्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत आणि जोपर्यंत आरक्षणाचा शासन निर्णय (GR) निघत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















