एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Manoj Jarange Patil : हा ओबीसीचा मोर्चा नाही, हा काँग्रेसचा मोर्चा आहे - जरांगे पाटील
नागपूरमध्ये (Nagpur) ओबीसींचा (OBC) भव्य मोर्चा, मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) जीआरला (GR) तीव्र विरोध. या मोर्चात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारला इशारा दिला, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी वडेट्टीवारांवर जोरदार पलटवार केला. 'मराठा समाजाने मुंबई जाम केली, जीआर रद्द न झाल्यास आम्ही मुंबईसह पुणे, ठाणेही जाम करू', असा थेट इशारा विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे यांनी वडेट्टीवारांवर टीका केली. ते म्हणाले की, वडेट्टीवार हे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नादी लागले असून स्वतःची राजकीय कारकीर्द संपवत आहेत. वडेट्टीवारांचा मोर्चा हा ओबीसींसाठी नसून काँग्रेस (Congress) संपवण्यासाठी आणि भाजपमध्ये (BJP) प्रवेश मिळवण्यासाठी आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला. मराठ्यांना त्यांच्या हक्काच्या नोंदीनुसार आरक्षण मिळत आहे, मात्र काही नेते गोरगरिब ओबीसींची दिशाभूल करत आहेत, असेही जरांगे म्हणाले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















