TOP 100 Headlines : 1 PM : 17 OCT 2025 : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha

Continues below advertisement
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला असून दोन्ही बाजूंकडून मोर्चे आणि सभांचे आयोजन केले जात आहे. बीडमधील ओबीसी महाएल्गार मेळाव्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली. 'ओबीसींचा मोर्चा नसून विशिष्ट जातीचा मोर्चा, त्यांना ओबीसींच्या हिताशी काहीही देणं घेणं नाही, मोर्चा काढणारे ओबीसींचे खरे शत्रू', असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शेतकरी मदतीच्या मुद्द्यावरून काळी दिवाळी आंदोलन केले असून सरकार सढळ हाताने मदत करण्यास तयार नसल्याची टीका केली आहे. भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तर, मनसेच्या दिपोत्सवाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, आमदार-खासदारांना ५०-१०० कोटी मिळतात, पण शेतकऱ्यांना ५ ते १० हजारांची मदत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी 'सामना'तून केला आहे. जालन्यात महापालिका आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola