Maratha Quota Row: 'भुजबळांना भेटून गैरसमज दूर करणार', मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांचे आश्वासन
Continues below advertisement
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण तापले असून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील विसंवाद वाढत आहे. 'माननीय भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना भेटून एकदा हे समजून सांगणार आहे,' असे आश्वासन मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या निष्कर्षांवर आधारित कार्यवाही सुरू असून, कुणबी प्रमाणपत्रे २४ तासांत मिळत असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे, मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या जीआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपवर टीका केली आहे. तर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा वाद सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement