Dhananjay Munde on Jarange : मी काय कोविड व्हायरस झालोय का?, धनंजय मुंडेंचा विरोधकांना संतप्त सवाल
Continues below advertisement
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले. 'मी काय कोविड वायरस झालो का?', असा संतप्त सवाल मुंडे यांनी त्यांना मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांपासून धोका असल्याच्या आरोपांवर केला. गंगाधर कालकुटे (Gangadhar Kalkote) यांना धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी नाकारला, उलट कालकुटे हे चांगले मित्र असून निवडणुकीत गोंधळ घालण्याबाबतची त्यांची ऑडिओ क्लिप (Audio Clip) असल्याचा दावा केला. संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) आरोपींना मदत केल्याचा जरांगेंचा आरोप खोटा असल्याचे ते म्हणाले. ओबीसी (OBC) आणि ईडब्ल्यूएस (EWS) चा मुद्दा काढल्यामुळेच आपल्याला लक्ष्य केले जात आहे का, असा प्रश्नही धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement