Manoj Jarange vs Chhagan Bhujbal पुन्हा जरांगे विरुद्ध भुजबळ वाद, भुजबळ,वडेट्टीवार एकत्र आलेत-जरांगे
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात एक गुप्त बैठक झाल्याचे समोर आले आहे. या बैठकीत भुजबळ यांनी अजित पवार यांनी आपल्याला गुंतवून ठेवल्याचे म्हटले, असा दावा करण्यात आला आहे. तसेच, ओबीसी आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसकडे द्यावे, असेही भुजबळ म्हणाले असल्याचा उल्लेख आहे. मराठा समाजाने जरांगे यांना उगाच नेता मानले आहे, ते मराठ्यांचे लीडर नाहीत, असे म्हणत भुजबळ यांनी जरांगे यांच्यावर पलटवार केला. मराठ्यांचे मोठे लीडर आहेत, असेही भुजबळ यांनी म्हटले. या घडामोडींमुळे सरकारला आणि मराठा-ओबीसी वादाला धोका निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. जातीच्या राजकारणामुळे ओबीसी नेत्यांनाही जातीवर बोलायला लावले जात आहे. मराठ्यांनी आणि सरकारने सावध राहावे, कारण आरक्षणाच्या नावाखाली जातीय वाद वाढवला जात आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement