Manoj Jarange Shantata Rally : हिंगोलीत मनोज जरांगेंची शांतता रॅली; 1200 स्वयंसेवक सहभागी होणार
Manoj Jarange Shantata Rally : हिंगोलीत मनोज जरांगेंची शांतता रॅली; 1200 स्वयंसेवक सहभागी होणार मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या मराठा आरक्षण (Maratha Reservation) शांतता रॅलीला (Shantata Rally) आज हिंगोलीतून (Hingoli) सुरुवात होणार आहे. जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम असून 13 तारखेनंतर भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. दरम्यान, हिंगोलीत जरांगेंच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सकाळी साडेअकरा वाजता जरांगेंच्या शांततात रॅलीला सुरूवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढणार आहे. शनिवारी 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत ही जनजागृती रॅली आणि शांतता रॅली काढणार आहे. ही रॅली राज्यभरात टप्प्याटप्यानं घेतली जाणार आहे. विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार : मनोज जरांगे मनोज जरांगेंची शांतता जनजागृती रॅलीची सुरुवात आज हिंगोलीपासून होणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज या रॅलीत सहभागी होणार आहे. तसेच, विधानसभेत 288 उमेदवार उभे करायचे की 288 पाडायचे? 13 तारखेनंतर ठरवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.