एक्स्प्लोर
Jarange Rahul Gandhi remarks | राहुल गांधींवर 'दिल्लीचा लालय' टीका, काँग्रेस आक्रमक
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका करताना मनोज जरांगेंनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. जरांगेंनी राहुल गांधींचा उल्लेख 'दिल्लीचा लालय' असा केला. या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला. जरांगेंनी राहुल गांधींबाबत वापरलेली भाषा अत्यंत निषेधार्ह असून मराठा समाजाला शोभणारी नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली. मनोज जरांगे म्हणाले, "त्या लालयने सांगितलं असन तिकडून दिल्लीत जाती गांधी एक लालय. त्याने सांगितलं असन मराठ्यांच्या विरोधात बोल म्हणून." काही नेते मतांसाठी जातीचे नेते बनले आहेत. समाजात फूट पाडण्याची शक्यता आहे. शब्द वापरताना गरिमापूर्ण असले पाहिजेत आणि भाषा सभ्यतेची असली पाहिजे. एका समाजाला न्याय देण्याच्या गोष्टी करताना उथळपणा नसावा. फडणवीस, केंद्र, ओबीसी नेते आणि शिवसेनेवर टीका करणे हा 'मेरी गो राउंड'चा खेळ नाही. हे कोणाच्याही हिताचे नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















