Manoj Jarange Patil Nagpur : शेतकऱ्यांचा पुत्र म्हणून मी आंदोलनात - जरांगे

Continues below advertisement
शेतकरी नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 'तुमच्या आरड्याओरड्यामुळे आणि गोंधळामुळे नेतृत्व काय सांगत आहे हे कळत नाही आणि आंदोलन अयशस्वी होऊ शकतं', असा स्पष्ट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. मुंबईतील आंदोलनाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, शांततेने आणि संयमाने ऐकल्यासच सरकारचा डाव मोडता येईल. आंदोलनाचा मूळ उद्देश सफल होण्यासाठी नेतृत्वावर विश्वास ठेवून शांतता राखणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले. मानपान आणि फोटोबाजीमुळे आंदोलनाचं नुकसान होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. बच्चू कडू यांच्या नागपुरातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे पाटील स्वतः रवाना झाल्याने आंदोलनाला अधिक बळ मिळालं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola