Manoj Jarange Mumbai Protest : 14 गणपती बसवायचा आणि निघायचं, 15 सप्टेंबरला सकाळी अंतरवालीतून निघायचं

Continues below advertisement

Manoj Jarange Patil Mumbai Maratha agitation: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी अंतरवाली सराटीतून मुंबईतील मराठा आंदोलनाची घोषणा केली. त्यानुसार मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईला नक्की किती तारखेला निघणार, याबाबत स्पष्टता नाही. मनोज जरांगे यांनी मार्ग जाहीर केला, मात्र कधी निघणार, तारीख काय, याबाबत अद्याप संभ्रम आहे. आपला पहिला मुक्काम बीडच्या पाटोद्यात असेल, असे जरांगेंनी सांगितले. याशिवाय अजून तारीख जाहीर केली नाही, जेव्हा तारीख ठरेल तेव्हा वादळ उठेल असं जरांगे म्हणाले.

 अंतरवाली सराटीतून ठिकठिकाणी मुक्काम करत मनोज जरांगे यांचा मराठा मोर्चा मुंबईत पोहोचणार आहे. प्रत्येक मुक्कामापूर्वी आपण दररोज 100 किलोमीटर अंतर पार करु, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे आता मराठा मोर्चा सप्टेंबर महिन्यात निघाल्यास गणेश विसर्जनापूर्वी मुंबईत पोहोचणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसं झाल्यास मुंबई पोलीस परिस्थिती कशाप्रकारे हाताळणार, हे बघावे लागेल.

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola