Jarange vs Munde: माझ्या हत्येचा कट, मुंडेंचा थेट हात; जरांगेंचा गंभीर आरोप
Continues below advertisement
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा सनसनाटी आरोप केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. 'धनंजय मुंडे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम केलंय,' असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे बीडच्या राजकारणासह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जरांगे यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांना संपवण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती आणि यासाठी बाहेरच्या राज्यातील पासिंग असलेली गाडी वापरण्याचा कट होता. या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून, आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या सीबीआय (CBI) चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, जालना पोलिसांनी या प्रकरणी अमोल खुणे आणि दादासाहेब गरूड या दोन व्यक्तींना अटक केली असून, त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement