एक्स्प्लोर
Maha Politics: 'माझ्या हत्येची अडीच कोटींची सुपारी', Dhananjay Munde यांच्यावर थेट आरोप
बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे तापले आहे. ' ब्रेन मॅपिंगसोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंगसोबत नार्को टेस्टसुद्धा करा,' असे आव्हान धनंजय मुंडे यांनी दिले आहे. जरांगे यांनी मुंडे यांच्यावर आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी पत्रकार परिषदेत मुंडे यांची एक कथित ऑडिओ क्लिप देखील सादर केली. या आरोपांना उत्तर देताना मुंडे यांनी जरांगे यांचाच आपल्याला संपवण्याचा डाव असल्याचा दावा केला. दोघांनीही एकमेकांना नार्को टेस्टचे आव्हान दिले असून, या वादामुळे मराठवाड्यातील मराठा आणि वंजारी समाजातील तणाव अधिक गडद होण्याची चिन्हे दिसत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तक्रारीनंतर दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Nilesh Rane Raid : बातमी कॅशची, रिपोर्ट राणेंचा, निलेश राणेंवरुन महायुतीत तेढ
Special Report Tanaji mutkule vs Santosh Bangar:स्टिंग ऑपरेशनचं टशन,2 डिसेंबरनंतर युतीचं काय होणार?
Special Report Raj Uddhav Meet : ठाकरे बंधूंची 13 वेळा भेट पण अजूनही यूती का नाही सेट?
Special Report Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजना सगळयात आवडती कोणाची? शिंंदे की फडणवीस?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
हिंगोली
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























