Malegaon : महाविकास आघाडीच मालगावचे शोले; काँग्रेसचे सर्व 28 नगरसेवक राष्ट्रवादीत ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमालेगाव नगरपंचायतीत काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. आणि हे खिंडार दुसरं तिसरं कुणी नाही तर महाविकास आघाडीत काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या राष्ट्रवादीनंच पाडलं. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या प्रदेश कार्यालयात आज मालेगाव महापालिकेतील काँग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्वादीचं घड्याळ हातावर बांधलं. मालेगाव मध्ये काँग्रेसची तीन दशकं धुरा सांभाळणारे आमदार रशीद शेख आणि महापौर ताहेरा शेख यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे पक्षप्रवेश झालेले. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठकीत समन्वयावर चर्चा झडत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीच्या दिग्दर्शनाखाली मालेगावचे शोले काँग्रेसला घाम फोडून गेले आहेत.