Nagpur Majha Impact : जिल्हाधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतल्या, सोयीसुविधा उपलब्ध होणार, ग्रामास्थांनी मानले माझाचे आभार
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) संभाव्य संघटनात्मक बदलांपासून ते नाशिकमधील (Nashik) गुन्हेगारी आणि मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Bomb Blast) प्रकरणापर्यंतच्या घडामोडी समोर आल्या आहेत. 'फारेस्टमध्ये असल्यामुळे महसूल दर्जा मिळणं शक्य नाहीये पण जे वैयक्तिक पट्टे आहेत ते तुम्हाला मिळू शकते...आणि रोड जे आहे ते खडीकारणासाठी तुम्ही एक प्रस्ताव तयार करा. त्याच्यामधून आम्ही पंधरा लाख, दहा ते पंधरा लाखापर्यंत खडीकरणाचा रस्ता आम्ही तयार करुन देतो,' असे आश्वासन प्रशासनाने नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) भगत हेटे वस्तीतील नागरिकांना दिले आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी आमदार रोहित आबा पाटील (MLA Rohit Aba Patil) यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नाशिकमध्ये सातपूर गोळीबार प्रकरणी लोंढे टोळीच्या कार्यालयात एक भुयार सापडले असून, म्होरक्या प्रकाश लोंढेसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, कोल्हापूरमध्ये मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेले समीर कुलकर्णी (Sameer Kulkarni) आणि मेजर रमेश उपाध्याय (Major Ramesh Upadhyay) यांचा हिंदू विधिज्ञ परिषदेतर्फे (Hindu Vidhidnya Parishad) सत्कार करण्यात येणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement