एक्स्प्लोर
Mumbai Fire: 'ओसी नसताना गोदामं, दुकानं सुरू होती', जोगेश्वरीतील JMS Center आगीप्रकरणी मनसेचा गंभीर आरोप
मुंबईच्या जोगेश्वरी (Jogeshwari) परिसरातील जेएमएस बिजनेस सेंटरला (JMS Business Center) लागलेल्या भीषण आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. 'या इमारतीला ओसी नसतानासुद्धा इथे गोदामं आणि दुकानं सुरू होती', असा गंभीर आरोप मनसेने (MNS) केला आहे, तर पालिकेच्या दुर्लक्षामुळे ही आग लागल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. गुरुवारी सकाळी लागलेली ही आग इमारतीच्या सातव्या मजल्यावरून दहाव्या मजल्यापर्यंत पसरली, ज्यात तीन मजले जळून पूर्णपणे खाक झाले. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर सुमारे चार तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या दुर्घटनेत अडकलेल्या १६ ते १७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असून, दोन ते तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे इमारतींच्या सुरक्षेचा आणि प्रशासकीय परवानगीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement



















