एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Special Report Mahesh Kothare: महेश कोठारेंच्या मोदीभक्तीवर संजय राऊतांचा त्याता विंचूवरुन टोला
ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यातील राजकीय वाद पेटला आहे. 'मी मोदीजींचा भक्त आहे आणि...मुंबईवरही कमळ फुललेलं असेल त्याची मला खात्री आहे,' असे विधान महेश कोठारे यांनी भाजपच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात केले. या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) BMC निवडणुकीच्या (BMC Elections) पार्श्वभूमीवर जागेवरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण मागाठाण्याची जागा शिंदे गटाकडे आहे. कोठारेंच्या या भाजप आणि मोदी भक्तीवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी, 'तात्या विंचू चावील तुम्हाला', असा खोचक टोला लगावला. त्यांनी कोठारे खरंच मराठी आहेत का? अशी शंकाही उपस्थित केली. यानंतर भाजपनेही राऊतांना प्रत्युत्तर देत, तात्या विंचू आणि महेश कोठारे यांच्यात खरा हिरो कोण आणि व्हिलन कोण? असा सवाल केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
पुणे
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















