Mahayuti Rift: रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपली

Continues below advertisement
रायगड जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे, जिथे राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) आणि भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी आव्हान दिले आहे. 'फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे', असा थेट आरोप महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद उफाळून आला असून, 'रोहा कोणाच्याही मालकीचं नाही, आम्ही तुमचा शेवटचा हिशेब करणार आहोत' असा इशारा दळवी यांनी दिला आहे. यावर, 'ज्या वेळेला राजकीय प्रतिकार करण्याची वेळ येते, त्या वेळेला दुप्पट वेगाने बाहेर पडतो,' असे म्हणत सुनील तटकरे यांनीही हिशेब चुकता करण्याचे प्रतिआव्हान दिले आहे. पालकमंत्री पदावरून नाराज असलेल्या भरत गोगावले यांनीही तटकरेंना सबुरीचा सल्ला देत आव्हान दिले आहे, ज्यामुळे रायगडमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola