Mahayuti Rift: 'निधी आमचा, श्रेय दुसरंच कोणी घेतंय', Vaibhav Khedekar यांचा Yogesh Kadam यांना टोला

Continues below advertisement
कोकणातील महायुतीत पुन्हा एकदा अंतर्गत वाद उफाळून आला असून, मनसेतून भाजपमध्ये आलेले वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी थेट गृहराज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्याविरोधात रणशिंग फुंकले आहे. 'या जिल्ह्यामध्ये कोट्यवधींचा निधी आपले नेते (BJP) देतात, परंतु त्याचं श्रेय मात्र दुसरेच घेत आहेत', अशा शब्दांत खेडेकरांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासमोर कदमांवर अप्रत्यक्ष टीका केली. दापोली विधानसभा मतदारसंघातील विकास निधीच्या श्रेयावरून हा वाद पेटला आहे. यापुढे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा फडकलेला दिसेल, असा शब्दही खेडेकरांनी दिला आहे. त्यामुळे मित्रपक्षातच सुरू झालेली ही धुसफूस आगामी काळात महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola