Mahayuti Rift: 'विकासकामांच्या आड याल तर पायावर सरळ जाणार नाही', Arjun Khotkar यांचा थेट इशारा
Continues below advertisement
जालन्यात (Jalna) महायुतीमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून, शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांना नाव न घेता इशारा दिला आहे. 'आम्ही आणलेल्या विकासकामांच्या आड याल तर पायावरती सरळ जाऊ शकणार नाही,' असे खोतकर म्हणाले. जालना महानगरपालिका हद्दीतील झोपडपट्टीधारकांना पीआर कार्ड (PR Card) देण्याच्या सर्वेक्षणाच्या उद्घाटनाच्या फलकावर अर्जुन खोतकर यांचे नाव वगळण्यात आले होते. पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde), रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते या फलकाचे उद्घाटन झाले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी आज फलकाला काळं फासलं आणि त्यानंतर खोतकर यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना खोतकर यांनी हा अप्रत्यक्ष इशारा दिला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement