Mahayuti Infighting: 'फसवणे हा त्यांचा धंदा', आमदार Mahendra Dalvi यांचा खासदार Sunil Tatkare यांच्यावर हल्लाबोल
Continues below advertisement
रायगड जिल्ह्यातील रोहा येथे अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरेंवर जोरदार टीका केली. 'फसवणे हा त्यांचा धंदा निश्चित आहे', असा घणाघात आमदार महेंद्र दळवींनी खासदार सुनील तटकरेंवर केला आहे. रोहा ही कुणाचीही मालकी नाही आणि आता त्यांचा हिशोब चुकता करणार, असा थेट इशाराही दळवींनी दिला आहे. तटकरेंमुळे अनेक कार्यकर्त्यांना फसवणुकीचा सामना करावा लागला आहे, असे सांगत त्यांनी आता यापुढे हे सहन केले जाणार नाही असे म्हटले. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे रायगडच्या राजकारणातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement