एक्स्प्लोर
Dilip Lande : 'मुंबईवर महायुतीचा महापौर सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन बसेल' - दिलीप लांडे
आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार तयारी सुरू केली असून, मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि आमदार दिलीप लांडे (Dilip Lande) यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. 'या मुंबई महानगरपालिकेवरती युतीचा महापौर सनातन धर्माचा भगवा ध्वज घेऊन बसेल,' असे खळबळजनक विधान आमदार दिलीप लांडे यांनी केले. युतीचे सर्व अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना देण्यात आले असून, शिवसेना जिथे धनुष्यबाण चिन्हासह लढेल, तिथे १०० टक्के यश मिळेल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. चांदिवली, पवई, कुर्ला, साकिनाका भागातील माजी नगरसेवक आणि पदाधिकारी या बैठकांना मोठ्या संख्येने उपस्थित होते, आगामी निवडणुकीत महायुतीचाच महापौर बनेल, असा दावाही करण्यात आला.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बातम्या
वर्धा
Advertisement
Advertisement
















