एक्स्प्लोर
Voter List Scam : मतदार यादीत लाखोंचा गोंधळ? निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
महाराष्ट्रातील मतदार यादीतील (Voter List) गोंधळावरून राजकारण तापले असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 'मी जे सांगितलंय की लाखो लोकं बोगस हिच्यामध्ये आहेत,' असा थेट आरोप नेत्यांकडून करण्यात आला आहे, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच शंका निर्माण झाली आहे. नागपूरमध्ये एकाच घरात २०० मतदार असल्याच्या आरोपावर, झोपडपट्टीतील घरांना क्रमांक नसल्याने तसा उल्लेख झाल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे. तर दुसरीकडे, सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच आपल्या मतदारसंघात ३६,००० दुबार नावे असल्याचा दावा केला आहे. अनेक ठिकाणी मृतांची नावे आणि स्थलांतरित नागरिकांची नावे मतदार यादीत कायम असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत, त्यामुळे आता संपूर्ण मतदार यादीच्या शुद्धीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
















