Rohit Pawar on Election Commission : निवडणूक आयोग म्हणजे BJP ची एक्स्ट्रा बॉडी
Continues below advertisement
महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील (Voter Lists) गोंधळावरून राजकारण तापले आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'निवडणूक आयोग हे स्वायत्त संस्थेसारखे काम न करता बीजेपीचे एक एक्स्ट्रा बॉडी म्हणून काम करते,' असा गंभीर आरोप विरोधकांनी केला आहे. लाखो दुबार मतदार असल्याचा दावा महाविकास आघाडी आणि मनसेने केला होता, ज्याला भाजप नेते आशिष शेलार यांनी काही प्रमाणात दुजोरा दिला. मात्र, त्यांनी विरोधकांवर मुस्लिम नावांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. अखेर, संभाव्य दुबार नावांपुढे 'स्टार' (**) चिन्ह लावण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने, विरोधकांनी हा आमच्याच भूमिकेचा विजय असल्याचा दावा केला आहे. याद्या साफ न करताच निवडणुका जाहीर झाल्याने वाद आणखी वाढला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement