एक्स्प्लोर
Voter List Row: मतदार यादीतील घोळ, मविआ-मनसे निवडणूक आयोगाच्या दारी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी मतदार यादीतील घोळावरून महाविकास आघाडी आणि मनसे आक्रमक झाली असून Sharad Pawar, Uddhav Thackeray, आणि Raj Thackeray यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. ‘विषय समजून घेण्याची कुवत नाही, झगामगा मला बघा यापलीकडे पोहच नाही’, अशा शब्दात भाजपचे मुख्य प्रवक्ते Keshav Upadhye यांनी विरोधी पक्षांच्या या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. दुसरीकडे, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मतदार यादीत थेट बदल करणे हे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभेची १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, विरोधकांचे समाधान न झाल्याने आज पुन्हा बैठक होणार असून, त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
नाशिक
करमणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
















