Scholarship Exam : मोठी बातमी! शिष्यवृत्ती परीक्षेचा नियम बदलला, आता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांना संधी
Continues below advertisement
महाराष्ट्र शासनाने शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमात मोठा बदल केला असून, आता ही परीक्षा इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणार आहे. शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार, 'पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीऐवजी इयत्ता चौथी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीऐवजी इयत्ता सातवीमध्ये घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.' हा बदल शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून लागू होणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळेल, जिथे अनेक शाळा चौथी किंवा सातवीपर्यंतच आहेत. नवीन संरचनेनुसार पहिली परीक्षा फेब्रुवारी २०२६ च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी आयोजित केली जाईल. या बदलासह, परीक्षेची नावे 'प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' (इयत्ता चौथी स्तर) आणि 'उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा' (इयत्ता सातवी स्तर) अशी करण्यात येणार आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement