Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो? 

केरळमध्ये अखेर मान्सून ३ दिवस उशिराने म्हणजेच ४ जून रोजी दाखल झाला असून महाराष्ट्राच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू झाली आहे. पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणात मान्सून धडकणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी दिला आहे. दरम्यान, विदर्भात मात्र १५ जूनच्या सुमारास मान्सून पोहोचेल, तोपर्यंत तिथला उकाडा कायम राहणार असून वर्धा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.यंदा मान्सूनचा प्रवास 3 दिवस उशिराने, मान्सून केरळात 1 जून रोजी दाखल होत असतो, मात्र यंदा तो 3 जून रोजी दाखल झाला आहे. याचदरम्यान, हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी महत्वाची माहिती दिली आहे. केरळमध्ये मान्सून धडकला असून यंदा तीन दिवस उशिराने आला आहे. मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल झालेली आहे. कोकणात सुद्धा 48 तासांत पाऊस दाखल होईल, अशी माहिती हवामान विभागाचे तज्ज्ञ प्रवीण कुमार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.विदर्भात तापमान 40 ते 42 अंशाचा घरात राहील. 10 जून नंतर तापमान कमी होईल. केरळला सामान्यतः एक जूनच्या सुमारास दाखल होतो. आता तीन दिवस उशिरा केरळमध्ये दाखल झाला आहे. पुढील 48 तासांत दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये कोकण मधला भाग तिथे पावसाचा अंदाज आहे, असं प्रवीण कुमार यांनी सांगितले.मान्सूनच्या अनुषंगाने परिस्थिती अनुकूल आहे. विदर्भात साधारणतः 15 जूनच्या सुमारास मान्सून दाखल होतो. विदर्भात पुढील काही दिवस वादळीवाऱ्याचा मध्यमस्वरूप आता पाऊस होईल. मात्र आता येणारा पाऊस हा अवकाळीच असेल, कारण मान्सूनच्या अनुषंगाने अजून विदर्भात अनुकुल वातावरण निर्माण व्हायचे आहे, असं प्रवीण कुमार म्हणाले. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola