Rohit Pawar Vs Navnath Ban: विद्यार्थी योजनांवरून सरकारमध्ये मतभेधद, रोहित पवार आक्रमक

Continues below advertisement
महाराष्ट्रातील विद्यार्थी हिताच्या योजनांवरून राजकारण तापले आहे, ज्यात एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजना सध्याचे सरकार बंद करत असल्याचा आरोप होत आहे. 'या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल, असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं,' असा थेट आरोप चर्चेत करण्यात आला. विरोधकांनी दावा केला आहे की, ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ यांसारख्या तब्बल आठ योजना देवेंद्र फडणवीस सरकारने बंद केल्या आहेत. यावर सरकारकडून स्पष्टीकरण आले असून, हे देवेंद्रजींचे सरकार विद्यार्थ्यांच्या हिताचेच आहे आणि अशा अफवा विरोधकांनी पसरवू नयेत, असे म्हटले आहे. कुठलीही जनहिताची योजना बंद केली जाणार नसून, काही योजनांमध्ये आवश्यक बदल करून त्या पुन्हा नव्याने आणल्या जाऊ शकतात, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola