Raj Thackeray Meet Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंशी युतीची चर्चा, तर राज-फडणवीस एकाच मंचावर, राजकीय चर्चांना उधाण
Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आज दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'पुनः शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग सोहळ्यासाठी एकाच मंचावर येणार आहेत. एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीला आकार येत असताना, दुसरीकडे फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील लोअर परळ परिसरात 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या गाजलेल्या चित्रपटाच्या पुढील भागाचा ट्रेलर लाँच सोहळा आयोजित करण्यात आला आहे. राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात आगामी पालिका निवडणुकांसाठी युती होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही एकत्र उपस्थिती अनेक राजकीय समीकरणे बदलण्याचे संकेत देत आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement