एक्स्प्लोर
Pawar vs Mohol: 'अध्यक्षपदी खेळाडू हवा', Ajit Pawar यांना आव्हान देत Murildhar Mohol निवडणूक रिंगणात
महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेच्या निवडणुकीत (Maharashtra Olympic Association Election) राजकीय वातावरण तापले असून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्याने, विद्यमान अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांना थेट आव्हान मिळाले आहे. 'अध्यक्षपदी एक खेळाडूच हवा, ही अनेक खेळाडू संघटनांची इच्छा आहे', असे सांगत राज्य कुस्तीगीर संघटनेने मोहोळ यांचा अर्ज दाखल केला. अजित पवार 2013 पासून या पदावर असून सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. तर, मोहोळ यांना कुस्तीगीर संघटनेने पाठिंबा दिला असून त्यांचा अर्ज सरचिटणीस योगेश दोडके यांनी दाखल केला. येत्या २ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या या निवडणुकीमुळे राज्याच्या क्रीडा वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















