Shinde Govt Schemes: 'एक-एक करून योजनांना बगल', 'माझी शाळा, सुंदर शाळा' नंतर इतर योजनाही बंद?

Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' (Mukhyamantri Majhi Shala, Sundar Shala) या महत्त्वाकांक्षी योजनेला आर्थिक भारामुळे स्थगिती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, 'या योजनांचा भार राज्याच्या तिजोरीवर येत असल्याकारणानेच या योजनांना बगल दिली जात आहे'. यापूर्वीही शिंदे सरकारने सुरू केलेल्या 'स्वच्छता मॉनिटर' (Swachhata Monitor), 'एक राज्य, एक गणवेश' (Ek Rajya Ek Ganvesh) आणि पुस्तकांना कोरी पानं जोडण्याच्या योजनांसारखे निर्णय मागे घेण्यात आले आहेत. 'आनंदाचा शिधा' (Anandacha Shidha) आणि 'शिवभोजन थाळी' (Shivbhojan Thali) यांसारख्या खर्चीक योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, शिंदे यांनी सुरू केलेल्या योजना एक-एक करून बासनात गुंडाळल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola