Poll Strategy: 'अजित पवारांविरोधात लढा, शिंदेंशी मैत्रीपूर्ण लढत', CM Fadnavis यांचा कानमंत्र
Continues below advertisement
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आहेत. 'कोणत्याही परिस्थितीत माहितीचा पर्याय निवडा, माहितीच्या माध्यमातनं निवडणुकीला सामोरं जाऊ अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा,' असा स्पष्ट सल्ला मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या बैठकीत दिला. आज मुंबई, ठाणे आणि कोकणातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. एकीकडे शिंदेंसोबत (Shinde Group) जुळवून घेण्याच्या आणि मैत्रीपूर्ण लढतीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात (Ajit Pawar NCP) आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. मराठवाड्यातील बैठकीत तर भाजपने स्वबळावर लढण्याची चाचपणी केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे महायुतीमध्ये स्थानिक पातळीवर नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement