Local Body Polls: मतचोरीच्या आरोपांदरम्यान 288 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर

Continues below advertisement
राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) राज्यातील अनेक वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे, तर दुसरीकडे सदोष मतदार याद्यांवरून (Flawed Voter Lists) विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत, राज्यातील २४६ नगरपरिषदा (Municipal Councils) आणि ४२ नगरपंचायतींसाठी (Nagar Panchayats) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यानुसार, २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी होईल. ही संपूर्ण प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारे (EVM) पार पडेल. या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू झाली असून, एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी १३,३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola